दुष्काळजन्य परिस्थिती; शिरूड येथे व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261123-WA1360

दुष्काळजन्य परिस्थिती; शिरूड येथे व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारी

 

अमळनेर : विक्की जाधव.

राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. विहिरींची पाणीपातळी खालावली असून अनेक ठिकाणी विहिरी आटल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्याची उभी पिके जळाली अशा गंभीर परिस्थितीत शिरूड गावात मात्र पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मारोती मंदिरालगत असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होताना दिसून आली. सकाळच्या सुमारास गावाला पाणीपुरवठा सुरू असताना व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी थेट रस्त्यावरून वाहत गटारीत जात असल्याचे चित्र दिसून आले. एवढेच नव्हे तर गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळील व्हॉल्व्हमधूनही अशीच पाण्याची गळती पाहायला मिळाली.

एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे गावातील पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जात आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच हा प्रकार सुरू असताना संबंधितांच्या नजरेस ही एवढी गळती पडत नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. दुरुस्ती करून ही गळती थांबविणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दुष्काळाची तीव्रता वाढण्यापूर्वीच पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दोन्ही ठिकाणच्या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा. तसेच गावातील अन्य व्हॉल्व्हचीही तपासणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येऊन पाण्याची नासाडी थांबणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!