रामवाडीतील तलाठी संजय शेटे यांच्या बदलीची प्रतीक्षा कायम; प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

27125CF1-B6C1-4A98-B2AE-C2B538C946EB

करमाळा (प्रतिनिधी) : रामवाडी व कावळवाडी गावाचा कार्यभार सांभाळणारे तलाठी संजय शेटे यांच्या कथित मनमानी कारभार, उद्धट वर्तणूक आणि इतर गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी करमाळा तहसील प्रशासनाकडे करण्यात आली होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही अद्याप संबंधित तलाठ्यावर कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणात बदली होणार की नाही, याबाबत तक्रारदार संतोष वारगड व ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून संजय शेटे यांच्याकडे रामवाडी व काळवाडीचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय नियमांनुसार दर तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित असतानाही त्यांनाच पुन्हा या गावांची जबाबदारी दिली जात असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. शेतीशी निगडित कामे, महसूल नोंदी आणि पंचनामे वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांना करमाळ्याला हेलपाटे मारावे लागतात. यासोबतच वारगड व ग्रामस्थानी निवेदनासोबत विविध तक्रारींचे फोटो व व्हिडिओ पुरावे सादर केल्याचा दावा केला असून, ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून फिरण्यावरूनही प्रश्न उपस्थित केला आहे.

पूर्वी कोळगाव येथील तलाठ्याविरोधात तक्रारी समोर आल्यानंतर करमाळ्याच्या तहसीलदारांनी तत्काळ दखल घेत बदलीची कारवाई केली होती. करमाळ्याच्या तहसीलदार जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून आदर्शवत कामकाज करत असतात. त्यामुळेच आता रामवाडी-काळवाडीतील परिस्थिती पाहता त्या संजय शेटे यांच्याबाबतही लवकरच योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

निवेदनातील मागणीनुसार ठरलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास ४ तारखेला धरणे आंदोलन व उपोषण छेडण्याचा, तसेच सर्व पुरावे घेऊन महसूल मंत्र्यांकडे जाण्याचा इशारा ग्रामस्थांनी आधीच दिला आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी बदलीचा आदेश निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!