भिगवण ITI मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली संविधान साक्षरतेची शपथ

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-11-26 at 3.48.35 PM

भिगवण ITI मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली संविधान साक्षरतेची शपथ
प्रतिनिधी : भागवत पवार

भिगवण, दि. २६ नोव्हेंबर : येथील विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) गुरुवारी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे प्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रशिक्षणार्थी, निदेशक व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

यावेळी प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून, संविधानाने नागरिकांना अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचा अंगीकार करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करणारी मनोगते व्यक्त केली. तसेच संविधानाच्या सन्मानार्थ संविधान साक्षरतेची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील निदेशक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!