June 28, 2025 1:58 pm

रोहित पवारांना पाचव्यांदा धोबीपछाड, सभापती राम शिंदेंच्या ताब्यात कर्जत दूध संघ

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोहित पवारांना पाचव्यांदा धोबीपछाड, सभापती राम शिंदेंच्या ताब्यात कर्जत दूध संघ

कर्जत दूध संघात आमदार पवार यांच्या गटाला उमेदवाराच न मिळाल्याने संघाची निवडणूक बिनविरोध झाली.

(प्रतिनिधित.संदिप कायगुडे ) कर्जत. कर्जत -जामखेड कृषी उत्त्पन्न बाजार समिती (Karjat and Jamkhed Agricultural Produce Market Committee) कर्जत नगरपंचायत, खरेदी विक्री संघ निवडणुकीनंतर पाचव्यांदा कर्जत दुध संघात आ.रोहीत पवार (Rohit Pawar) यांना एकही उमेदवार न मिळाल्याने संघाची निवडणुक बिनविरोध करत पाचव्यांदा रोहित पवारांना धोबीपछाड दाखवत सभापती राम शिंदे(Ram Shinde) यांनी मतदार संघातील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. कर्जत दूध संघात आमदार पवार यांच्या गटाला उमेदवाराच न मिळाल्याने संघाची निवडणूक बिनविरोध झाली व प्रा. शिंदे यांचे समर्थक तेथे सत्तारूढ झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक प्रक्रिया संघ (Balasaheb Patil Cooperative Milk Union) मर्यादित या सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. सभापती प्रा. शिंदे यांचे समर्थक 15 संचालक त्यावर निवडले गेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना प्रतिस्पर्धी उमेदवार उभे करता आले नाही. कर्जत व जामखेडच्या बदलत्या राजकारणात सभापती प्रा. शिंदे यांनी आमदार पवार यांना दुसऱ्यांना मात दिली आहे. कर्जत नगरपंचायतीत आमदार पवार यांची सत्ता असताना तेथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही व काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंड केले व सभापती प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब पाटील सहकारी दूध संघातही सभापती शिंदे समर्थकांची सत्ता आली आहे. आमदार पवारांना हा दुसरा धक्का मानला जात आहे.

लोकाभिमुख कारभार करा- प्रा. शिंदे
सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक प्रक्रिया संघाच्या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांनी शनिवारी अहिल्यानगर येथील सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन सभापती प्रा. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रा. शिंदे यांनी सर्व संचालकांचा सत्कार केला. दूध संघाचा कारभार लोकाभिमुख करा व सहकाराच्या तत्त्वाप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन संघाची प्रगती करा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!