नवीन वर्ग,नवीन वह्या, नवीन पुस्तक, नवीन शिक्षक आणि काही नवीन मित्र सुद्धा या सर्व गोष्टी एका सुंदर शिक्षण प्रवासाची सुरुवात करतात :- विशाल निंबाळकर
प्रतिनिधी-विजय केळझरकर
.विठ्ठल मंदिर प्रभागातील चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूल मध्ये विद्यार्थी यांचे थाटात, उत्साहात स्वागत कार्यक्रम करण्यात आले. विद्यार्थी साठी हा दिवस अत्यंत खास होता. शाळेच्या पहिला दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा विद्यार्थी शहरातील प्रभागांमध्ये शाळा, स्कूल,कॉन्व्हेंट मध्ये दाखल झाले. काही नवीन चेहरे काही जुन्या आठवणी आणि बरोबर नवे संकल्प नव्या -उमेदीने पुढे जाण्याची तयारी. प्रत्येक शाळेच्या पहिला दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात असते.
चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूल मधील विद्यार्थी यांचे स्वागत औक्षवंत करून पुष्प देऊन फुलांची ची वर्षाव करत स्वागत करण्यात आले.मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य होते. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रभागाचे माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मंगेश गुलवाडे, सिनेट सदस्य यश बांगडे, भाजयुमो महामंत्री गणेश रामगूडावार, भाजयुमो उपाध्यक्ष पराग मलोडे, सौरव मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्ये ची देवता सरस्वती माता पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करताना प्रभागाचे माजी नगरसेवक विशाल निंबाळकर बोलले की नवीन वर्ग, नवीन वह्या, नवीन पुस्तकं, नवीन शिक्षक आणि काही नवीन मित्र सुद्धा या सर्व गोष्टी एक सुंदर शिक्षण प्रवासाची सुरुवात करतात -शिक्षणाचा अनुभवाचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास लहान वर्गातील मुलांसाठी हा दिवस थोडासा अनोळखी वाटतो पण काळजी करू नका – ही शाळा स्कूल तुमच् दुसरं घर आहे. तुमच्या सोबत तुमचे शिक्षक आहेत. मान्यवरांच्या स्वागत करून विद्यार्थ्यांच्याशी संवाद करण्याची संधी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हजबनं सर यांनी करून दिले. विध्यार्थी यांच्या स्वागत कार्यक्रम ला चिल्ड्रेनस अकॅडमी स्कुल च्या प्रिन्सिपल अक्षता मॅडम आणि शिक्षक, शिक्षिका संपूर्ण स्कुल कर्मचारी उपस्थित होते.