शेअर बाजार थेट अपडेट्स: इस्रायलने शस्त्रसंधी मान्य केल्यानंतर सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी; निफ्टी 25,200 च्या वर
मुंबई/वर्षा चव्हाण
आज मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने तब्बल 900 अंकांची झेप घेतली, तर निफ्टीने 25,200 चा टप्पा पार केला. या घसघशीत वाढीमागे इस्रायल आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीचा करार आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण हे मुख्य कारण आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीची घोषणा केली असून, त्याचा सकारात्मक परिणाम जगभरच्या शेअर बाजारांवर झाला आहे. त्याचा परिपाक भारताच्या बाजारातही दिसून आला.
🔴मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ:
बीएसईवरील सर्व नोंदणीकृत कंपन्यांची एकत्रित बाजार भांडवली (Market Capitalisation) आज ₹4.43 लाख कोटी रुपयांनी वाढून ₹452.25 लाख कोटींवर पोहोचली.
🟠सेक्टरनिहाय स्थिती:
प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटो, आयटी, मेटल, पीएसयू बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस यामध्ये 1% ते 2% दरम्यान वाढ झाली.
मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही सुमारे 1% वाढ झाली असून, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दिसून येतो आहे.
🟢आजच्या टॉप स्टॉक्स अपडेट्स:
1.BPCL, HPCL आणि इतर OMC शेअर्समध्ये 5% पर्यंत उसळी, कारण क्रूड ऑइलचे दर $70 प्रति बॅरलच्या खाली
2.ACME Solar ला राजस्थानातील 250 MW प्रकल्पासाठी ₹1,072 कोटींचे रिफायनान्सिंग मिळाले; शेअर 3% वाढले
3.HG Infra Engineering ला नौदल गोदी प्रकल्पासाठी ₹118 कोटींची निविदा मिळाली; शेअर 4% ने वधारले
4.Devyani International ने Biryani By Kilo मध्ये अतिरिक्त हिस्सेदारी घेतली; शेअर 3% ने चढले
5.Enviro Infra Engineers ला छत्तीसगडमध्ये ₹306 कोटींचे प्रकल्प मिळाले; शेअरमध्ये 11% ची उसळी
⚫का वाढला बाजार आज?
1. इस्रायल-इराणमध्ये शस्त्रसंधी
2. जगभरातील बाजारांमध्ये तेजीचा माहोल
3. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, परिणामी OMC कंपन्यांना फायदा