न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-28 at 2.11.11 PM दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

WhatsApp Image 2026-11-28 at 6.09.52 PM अखेर अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा! प्रशासनाच्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची भूमिका घेतली.

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

IMG-20261127-WA1624(1) स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.51 AM अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.51 AM

अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

अमळनेर | विक्की जाधव

मराठी साहित्याच्या शताब्दी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून अमळनेर येथे रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथे २७ ते ३० जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संमेलनात खान्देशची समृद्ध लोकसंस्कृती, विविध बोलीभाषा, साहित्य, कविता, गझल आणि शाहिरी कलेचा संगम अनुभवायला मिळणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, अमळनेर शाखेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक आणि कोषाध्यक्ष उमेश काटे यांनी ही माहिती दिली.

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, चित्रपट लेखक व गीतकार प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर, तर स्वागताध्यक्षपदी कवी तथा निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे. स्व. साहित्यिक आबासाहेब अभिमन्यू नथू पाटील साहित्यनगरीत सकाळी ८.३० वाजता संमेलनाला प्रारंभ होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलपूजनाने उद्घाटन करण्यात येणार आहे.

स्व. कवी निंबा सदाशिव पाटील सभागृहात होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष व प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर (पुणे) यांच्या हस्ते होईल. यावेळी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

खान्देशातील बोलीभाषांचा रंगतदार परिसंवाद

सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ या वेळेत ‘खान्देशातील वैभवशाली बोलीभाषांची विविधता’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. मुंबईचे बापूसाहेब हटकर अध्यक्षस्थानी असतील. प्रा. डॉ. फुला बागुल (अहिराणी), सुनील गायकवाड (भिलाऊ), प्रा. संध्या महाजन (लेवा गण), विलास पाटील (गुजर) आणि प्रा. डॉ. मोहन पावरा (पावरा) हे वक्ते विविध बोलीभाषांची वैशिष्ट्ये मांडतील. अहिराणी नाट्यकर्मी प्रवीण माळी यांचे विशेष सादरीकरणही होणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त राजू बाविस्कर यांची मुलाखत

दुपारी १ ते २ या वेळेत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. भाऊसाहेब देशमुख आणि शरद पाटील हे त्यांच्याशी संवाद साधतील.

गझल आणि कवितांचा सुरेल आस्वाद

दुपारी २ ते ४ या वेळेत गझल संमेलन व कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. धुळे येथील कवी प्रा. प्रभाकर शेळके अध्यक्षस्थानी असतील. प्रकाश पाटील, सागर कोळी, विजय निकम, भाऊसाहेब पाटील, रमेश महाले, गो. शि. म्हसकर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रवीण पवार, जयराम मोरे, तुषार पाटील, योगिता पाटील, प्राची पाटील, आशा सोनवणे आणि नयन पाटील आदी कवी आपल्या कविता व गझल सादर करणार आहेत.

पुस्तक प्रकाशन आणि शाहिरी कलेचा आविष्कार

दुपारी ४ ते ४.३० या वेळेत पुस्तक प्रकाशन सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र शाहीर परिषद शाखा जळगाव आणि खान्देश लोक रंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंग शाहिरी कलेचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. खान्देशभूषण लोकशाहीर शिवाजीराव पाटील व त्यांचे सहकारी शाहिरी सादरीकरणातून खान्देशच्या लोककलेचा जागर करणार आहेत.

संमेलनाच्या आयोजनासाठी स्वागत समितीचे सचिव बन्सीलाल भागवत, सहसचिव संजय चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर परिश्रम घेत आहेत. श्री मंगळग्रह सेवा संस्था, मराठी वाङ्मय मंडळ, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, खान्देश साहित्य संघ आणि साहित्य भारती यांचे सहकार्य लाभणार आहे.

साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

खान्देशच्या बोलीभाषा, साहित्य, कविता, गझल आणि लोककलेचा अनोखा संगम असलेल्या या नांदी साहित्य संमेलनात साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, अमळनेर शाखेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष उमेश काटे, कार्याध्यक्ष रमेश पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!