न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-28 at 2.11.11 PM दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

WhatsApp Image 2026-11-28 at 6.09.52 PM अखेर अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा! प्रशासनाच्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची भूमिका घेतली.

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

IMG-20261127-WA1624(1) स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.51 AM अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

कत्तलखाना बंदच्या मागणीने अमळनेरमध्ये प्रशासनाची धावपळ; नगराध्यक्षांचे आश्वासन, “सर्व मागण्या पूर्ण करू!”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.53 AM

कत्तलखाना बंदच्या मागणीने अमळनेरमध्ये प्रशासनाची धावपळ; नगराध्यक्षांचे आश्वासन, “सर्व मागण्या पूर्ण करू!”

अमळनेर | विक्की जाधव

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.53 AM (2)

कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, गोहत्या व गोमांस विक्रीला आळा घालावा आणि संबंधित ठिकाणांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी अमळनेर येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. व्यापारी, भाजीपाला विक्रेते, अडतदार, मोबाईल व्यावसायिकांसह विविध व्यापारी संघटनांनी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आंदोलकांनी ठोस कारवाई होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

नगराध्यक्षांचे आश्वासन; संबंधित ठिकाण सील

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गोहत्या होत असल्याचा आरोप असलेल्या आणि यापूर्वी गोमांस आढळल्याचे सांगण्यात आलेल्या संबंधित ठिकाणाला नगरपालिका प्रशासनाने सील केले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच जेसीबीच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्याधिकारी यांनी १९६५ च्या कायद्यानुसार संबंधित ठिकाण सील केल्याचे सांगितले. तेथे सीसीटीव्हीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम किंवा जमीन असल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल; मात्र शासकीय इमारत अथवा जागेबाबत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

खासदार स्मिता वाघ यांचाही हस्तक्षेप

या प्रकरणाची दखल खासदार स्मिता वाघ यांनी घेत जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. संबंधित प्रकरणात लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे आंदोलनाला जिल्हास्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे.

आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई करा!

गेल्या दोन वर्षांपासून निवेदने आणि तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेतले जाणार नसून प्रत्यक्ष कारवाई झाल्याशिवाय उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

शिवाजी महाराजांच्या नावाचीही मागणी

आंदोलनादरम्यान धुळे रोडकडून अमळनेर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे कत्तलखान्याच्या प्रश्नासोबतच शहराच्या अस्मितेचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित झाला.

नगरसेवकांच्या अनुपस्थितीची चर्चा

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील नगरसेवकांच्या उपस्थितीचा मुद्दाही चर्चेत आला. नगराध्यक्षांनी मोर्चा नगरपालिका कार्यालयात येण्यापूर्वी नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याची चर्चा होती. मात्र अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने पालिकेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा रंगली. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्या अनुपस्थितीचीही शहरात चर्चा झाली. संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

या आंदोलनाला महाजन समाजाने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिला. व्यापारी, मोबाईल दुकानदार, अडतदार, भाजीपाला विक्रेते आणि विविध व्यावसायिकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड जिल्हामंत्री राकेश लोहार, जिल्हा सहमंत्री ललित खडके, प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंडमंत्री सचिन चौधरी, प्रखंड गोरक्षक विश्वनाथ मिस्त्री, शहर गोरक्षक स्वप्निल पाटील, डॉ. संजय शाह, विजय बारी, दादू भगत, सुशील महाराज, गोविंददास महाराज, महागौरी ताई, विजय पाटील, जयेश चौधरी, जगदीश महाजन, पवन बारी, मनोज महाजन, ओम महाजन, अजय पाटील, योगेश लांडगे, सागर कोळी, मितेश कामदार, प्रवीण पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आता आश्वासनांची अंमलबजावणी कधी?

कत्तलखाना बंदच्या मागणीवरून सुरू झालेले आंदोलन आता अमळनेरच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेसमोर आव्हान ठरले आहे. नगराध्यक्षांचे आश्वासन, सील केलेले ठिकाण, प्रस्तावित जेसीबी कारवाई आणि आंदोलकांचा ठोस कार्यवाहीचा आग्रह यामुळे पुढील काळात प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!