न्यूज
ब्रेकिंग

d5aedc5c-c136-475c-b073-7ebd5797ad5c करमाळ्यात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला संविधान दिनाचा विसर; जाब विचारताच पत्रकाराशी विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी कार्यालयात संविधान दिन साजरा न केल्याची अधिकाऱ्यांची कबुली; वरिष्ठांकडून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन….

C6ED339F-3C9C-4B1F-8783-F42399AB9581 दुष्काळी संकटात गरिबांच्या खिशाची जाण असलेल्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांचे प्रियांका गायकवाड यांच्याकडून कौतुक

1AAA98FB-76AE-4D68-95CC-85B1CDF270D0 करमाळा नगरपरिषद थकीत मालमत्ता करावरील दंडात ५० टक्के सवलत – नगराध्यक्षा मोहिनी सावंत

IMG-20261127-WA0583 कत्तलखाना बंदच्या आंदोलनाने अमळनेरचे राजकारण तापले! भाजीपाला मार्केटसह व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा; आमदार मुंबईत, माजी आमदार नंदुरबारात; नगराध्यक्षांसमोर नगरसेवकांच्या भूमिकेचे आव्हान

WhatsApp Image 2026-11-26 at 3.48.35 PM भिगवण ITI मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली संविधान साक्षरतेची शपथ

करमाळ्यात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला संविधान दिनाचा विसर; जाब विचारताच पत्रकाराशी विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी कार्यालयात संविधान दिन साजरा न केल्याची अधिकाऱ्यांची कबुली; वरिष्ठांकडून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन….

अपनी भाषा में पढ़े! Translate

d5aedc5c-c136-475c-b073-7ebd5797ad5c

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):-  भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना असताना, करमाळा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात मात्र संविधान दिन साजरा करण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला कार्यालयातील विस्तार अधिकारी संदीप रणदिवे यांनी अरेरावीची भाषा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत दैनिक लोकसह्याद्रीच्या पत्रकाराने बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आपल्या कार्यालयात संविधान दिन साजरा केला नसल्याचे मान्य केले. करमाळा पंचायत समिती येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्यामुळे, कार्यालयात स्वतंत्रपणे कार्यक्रम घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यालयातील अधिकारी आलाट यांनी कार्यालयात भारतीय संविधानाची उद्देशिका उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, विस्तार अधिकारी संदीप रणदिवे यांनी महापुरुषांच्या जयंती तसेच राष्ट्रीय सणांचे कार्यक्रम आम्ही आमच्या कार्यालयात साजरे करत नाही, तर करमाळा पंचायत समिती कार्यालयात साजरे करतो, असे उत्तर दिले.
यावर पत्रकाराने संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या प्रतिक्रियेप्रमाणेच बातमी प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले. तसेच कार्यालयात संविधान दिन साजरा करण्याची आवश्यकता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली तर चालेल का? असा सवाल उपस्थित केला. यानंतर रणदिवे यांनी संताप व्यक्त करत पत्रकाराशी मोठ्या आवाजात आणि अरेरावीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार बालविकास प्रकल्प अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेला आहे. या प्रकरणात बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण यांनी कार्यालयाकडून झालेली चूक मान्य करत, यापुढे शासनाच्या सूचनांचे पालन केले जाईल, तसेच राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती आणि संविधान दिन कार्यालयात साजरा केला जाईल असे सांगितले. मात्र, विस्तार अधिकारी रणदिवे यांच्या अरेरावीच्या वर्तनामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस साजरे करणे आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना संबंधित कार्यालयात असा प्रकार का घडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई करतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

करमाळा पंचायत समिती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कर्मचारी महापुरुषांच्या जयंती आणि राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असले, तरी त्यांनी स्वतःच्या कार्यालयात ही शासनाच्या परिपत्रकानुसार अशा कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कार्यालयातील बेजबाबदार अधिकारी तसेच पत्रकारांशी अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

– स्वप्निल काळे, सदस्य, करमाळा पंचायत समिती

करमाळा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती आणि संविधान दिन साजरा करण्याबाबत यापूर्वीही अनास्था दिसून आली आहे. पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयात असे कार्यक्रम साजरे होत नसल्याचे अधिकारीच सांगत असतील, तर भविष्यातील पिढीला संबंधित कार्यालयाकडून कोणते संस्कार आणि शिक्षण दिले जाणार? असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत सोलापूर जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, प्रत्येक शासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले. करमाळा येथील कार्यालयात संविधान दिन का साजरा झाला नाही? याची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

– उत्तरेश्वर कांबळे, प्रदेशाध्यक्ष, भीम आर्मी संघटना

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!