न्यूज
ब्रेकिंग

WhatsApp Image 2026-11-28 at 2.11.11 PM दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

WhatsApp Image 2026-11-28 at 6.09.52 PM अखेर अनधिकृत कत्तलखान्यावर प्रशासनाचा हातोडा! प्रशासनाच्या कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची भूमिका घेतली.

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

IMG-20261127-WA1624(1) स्व. उदय भिकनराव वाघ यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

WhatsApp Image 2026-11-28 at 10.10.51 AM अमळनेरमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा साहित्यिक सोहळा; अहिराणी बोलींचा जागर, राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत अन् शाहिरी कलेची मेजवानी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड

अपनी भाषा में पढ़े! Translate

Screenshot 2026-11-28 163446vfd bdf

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न सुरक्षा विभागाचा मोठा दणका! १२ हॉटेल, कॅन्टीन, मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; अस्वच्छतेचे गंभीर प्रकार उघड
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी_शेखर शिरसाट

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १२ हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी आणि ऑनलाइन डार्क स्टोअरवर कारवाई करण्यात आली आहे.

‘Safe Food Safe Maharashtra’ या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत अनेक आस्थापनांमध्ये अन्नपदार्थांच्या हाताळणीपासून साठवणुकीपर्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे प्रशासनाने संबंधित १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने आणि नोंदणी तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच कीड नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसणे, स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि अन्नपदार्थांची साठवणूक करताना आवश्यक खबरदारी न घेणे अशा त्रुटी आढळल्या.

अन्नपदार्थ तयार करताना आणि ग्राहकांना देताना स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, तपासणीदरम्यान या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.
कारवाई झालेल्या १२ आस्थापनांची यादी
1. ब्लिंकिट स्टोअर, उस्मानपुरा-इटखेडा

2. एमआयटी कॅन्टीन, बीड बायपास

3. हॉटेल न्यू राज दरबार, देवळाई

4. राजदरबार मराठा हॉटेल, गारखेडा

5. श्री हरी दूध डेअरी अँड बेकर्स, देवळाई

6. रॉयल हॉटेल, नेहरू चौक, छावणी

7. केजीएन केटरर्स, पहाडसिंगपुरा

8. एस. के. सवेरा हॉटेल, शहाबाजार

9. जयश्री फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट, वैजापूर

10. टेके फरसाण अँड बाबा मिसळ पाव सेंटर, वैजापूर

11. श्री चामुंडा बिकानेर स्वीट, आळंद, फुलंब्री

12. एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज कॅन्टीन, वाळूज एमआयडीसी

 

936735149_4658371060976030_430883059271920262_n (1)

१५ दिवसांची मुदत; लेखी परवानगीशिवाय व्यवसाय सुरू करता येणार नाही!
अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनांना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, कीड नियंत्रण आणि इतर आवश्यक नियमांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

मुदत संपल्यानंतर संबंधित आस्थापनांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये आवश्यक सुधारणा झाल्याची खात्री झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांची लेखी परवानगी मिळाल्यावरच पुन्हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको!
हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, डेअरी आणि कॅन्टीनमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक अन्नपदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी प्रशासनाने अशा तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज आहे.

सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!