June 28, 2025 3:00 pm

लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी, तर सचिव पदी महेंद्र पाटील यांची नियुक्ती..

अपनी भाषा में पढ़े! Translate

लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी, तर सचिव पदी महेंद्र पाटील यांची नियुक्ती..

 

अमळनेर : विक्की जाधव.

सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरची २०२५-२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी नूतन अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी यांची निवड झाली असून, सचिवपदाची महेंद्र पाटील यांच्याकडे जबाबदारी  सोपवण्यात आली आहे. नितीन विंचूरकर हे खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येत्या रविवारी, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल मिड टाऊन येथे आयोजित करण्यात आला आहे. पुढील वर्षाच्या समाजोपयोगी कार्यांना या नवीन कार्यकारिणीमुळे नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!