June 28, 2025 2:07 pm

अमळनेर परिसरात पावसाची अनिश्चितता – शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक पावसावर अवलंबून राहावे : कृषिभूषण  पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर परिसरात पावसाची अनिश्चितता – शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक पावसावर अवलंबून राहावे : कृषिभूषण  पाटील

 

अमळनेर : विक्की जाधव.

येत्या चार आठवड्यांमध्ये अमळनेर परिसरासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सदर माहिती आदर्श शेतकरी कृषी भूषण माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांनी दिली आहे.

हवामान अंदाज पुढीलप्रमाणे : पहिला आठवडा (२७ जून – ३ जुलै २०२५): मध्य महाराष्ट्रात काही भागांत पाऊस अपेक्षित असला तरी अमळनेरसह इतर भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता. दुसरा आठवडा (४ – १० जुलै):

कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता. मात्र अमळनेर व परिसरात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता. तिसरा आठवडा (११ – १७ जुलै): उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर असू शकतो. अमळनेरात मात्र पावसाचे प्रमाण पुन्हा कमी राहण्याचा अंदाज.चौथा आठवडा (१८ – २४ जुलै):

संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने अमळनेरसाठीही ही स्थिती लागू आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, पहिल्या दोन आठवड्यांचा अंदाज अधिक अचूक असतो, त्यानंतर अचूकतेत घट होते. पुढील अंदाज गुरुवारी नव्या मॉडेल फोरकास्टनंतर दिला जाणार आहे.

माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “हवामानाच्या बदलत्या स्थितीचा विचार करून शेतीचे नियोजन करावे. अतिवृष्टी किंवा अल्पवृष्टी दोन्ही शक्यतांचा विचार करून पर्यायी योजनेसह काम करणे आवश्यक आहे.”

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!