माऊली पॉलिटेक्निकचा 95% निकाल – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
अमळनेर : विक्की जाधव.
माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई मार्फत झालेल्या उन्हाळी परीक्षा 2025 मध्ये संस्थेचा 95% निकाल लागला असून, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
तृतीय वर्ष: प्रणव कांतीलाल चौधरी – 92.24% भूषण रवींद्र पाटील – 87.47% मिलिंद अशोक पाटील – 82.21%
द्वितीय वर्ष: अनुष्का विजय देवरे – 87.44% ऋषिकेश किरण पाटील – 84.89% चेतन पावभा धनगर – 84.44%
प्रथम वर्ष: अथर्व प्रवीण पाटील – 85.44% मृदुला सुरेश खैरनार – 85.41% आर्यन विपीन सोनवणे – 83.88%
ग्रामीण भागात कार्यरत असूनही संस्थेने गुणवत्तेची परंपरा अखंड ठेवली आहे. यशस्वी निकालामध्ये डॉ. विनोद मोहितकर, डॉ. प्रमोद नाईक, डॉ. गोरक्ष गर्जे, आणि प्रा. देवेंद्र दंडगव्हाळ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, सचिव डॉ. संदीप जोशी व प्राचार्य श्री. कुणाल पाटील यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.