June 28, 2025 2:07 pm

अमळनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली!

रस्त्यावरच प्रसूती: संजनाने बाळंतपणात पार केलं दोन किलोमीटरचं अंतर..
मुलींना हातात घेऊन प्रसूतीसाठी एकटी निघाली; अखेर ओट्यावरच जन्म झाला गोंडस मुलीचा

 

अमळनेर : विकी जाधव.

अमळनेर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सारबेटे तांडा येथील संजना शांताराम राठोड (वय ३०) हिला २३ जूनच्या रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. नवरा बाहेरगावी असल्याने संजना घरी एकटीच होती. तीन चिमुकल्या मुलींच्या सहवासात तीने धाडसाने ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला.

दाट अंधार, वेदना, पावसाचे वातावरण असूनही संजनाने आपल्या लेकरांना हातात घेत दोन किलोमीटरचे अंतर पायी पार केले. हे प्रगतितिशील राष्ट्राला आणि अमळनेर तालुक्याचा विकासाला गती देणाऱ्यां राजकीय पुढाऱ्यांसाठी  लाजिरवाणी गोष्ट आहे. थोडक्यात काय तर अमळनेर तालुक्याचा विकास हा कागदावरच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. 

सारबेटे खुर्द येथे पोहोचताच तिची अवस्था गंभीर होत गेली. त्यानंतर ब्रह्मे कुटुंबीय व गावातील माता भगिनींनी प्रसंगावधान राखत तिला तत्काळ मदत केली.

आरोग्य केंद्र गाठायच्या आधीच प्रसूतीची वेळ आली आणि गावातच ओट्यावर तिची यशस्वी प्रसूती झाली. एका गोंडस मुलीला जन्म दिला.

सवाल असा की, जर आरोग्य व्यवस्था सक्षम असती, तर एका महिलेला एवढ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असत्या का?

सध्या सर्वत्र पावसाळा सुरू असून साथीचे आजार वाढत आहेत. तरीही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, कर्मचारी, सुविधा यांची वानवा आहे. याआधीही मांडळ, चोपडा येथे आरोग्य सुविधा न मिळाल्याने महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेतील अपयश आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रसंग ठरतोय.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!