सुरंगली परिसरात समाधान कारक पाऊस पिकांना जिवदान
सुरंगली पिकं पाणी वार्ता पत्र संजीव पाटील। भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे काल दिनांक 25 जुन रोजी बुधवार दिवसा आणि रात्री समाधान कारक पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जिवदान मिळाले. आज गुरुवार दिनांक 26 जुन दुपारी पाऊस सुरु आहे. सुरंगली सह परिसरात ऐशींटक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. विस टक्के पेरण्या बाकी होत्या. कोवळी पिकें. पाण्याअभावी सुकत होती . काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन ने पिके वाचण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी चे संकट उभे राहते की काय असे वाटत असतानाच काल पासुन पाऊस सुरु झाल्या मुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जुन महीना संपत आला असून नदी नाले अद्याप ही कोरडेच आहेत.परीसरात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी कापुस पिकांचे पेरणी कमी असुन सोयाबीन चे पण क्षेत्र कमी होणार आहे.गत वर्षी सोयाबीन कापुस भाव न मिळाल्याने शेतकरी मका ,मिरची पिकाकडे वळला आहे.तूर , मूग उडीद यांचा पेराही कमी झाला आहे.