June 29, 2025 11:22 am

‘नेत्रम’ची नजर अमळनेरवर! शहरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘नेत्रम’ची नजर अमळनेरवर! शहरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन

 

अमळनेर – विक्की जाधव.

अमळनेर शहराच्या सुरक्षेसाठी आता ‘नेत्रम’ यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस स्टेशनमधूनच संपूर्ण शहरावर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर ठेवता येणार आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे आता एकाच नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असून, या नव्या यंत्रणेचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, “अमळनेरमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावेल. पोलीस स्टेशनमधूनच शहरावर नजर ठेवता येणं ही काळाची गरज होती.” यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील, डीवायएसपी विनायक कोते आणि डीवायएसपी केदार बारबोले यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले की, “अमदार निधी आणि लोकसहभागातून बसवलेले कॅमेरे पोलीस स्टेशनशी जोडण्यात आले असून, त्यांची देखभाल व देखरेख आता पोलीसच करतील.”

या यंत्रणेच्या स्थापनेत तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे विशेष प्रयत्न लाभले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.

यावेळी महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा. शीला पाटील, प्रमोदिनी पाटील, अलका गोसावी, भारती शिंदे यांच्यासह, के. डी. बापू, मुख्तार खाटीक, महेंद्र बोरसे, योगेश महाजन, राकेश पाटील, सुरेश पाटील, इम्रान खाटीक, सलीम टोपी, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, आरिफ भाया, फिरोज मिस्तरी, नरेंद्र संदानशीव हे उपस्थितीत होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!