ब्राईड होप फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

ब्राईड होप फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

अमळनेर  : विक्की जाधव 

शहरातील तांबेपूरा येथिल ब्राईड होप फाउंडेशनच्या वतीने श्री. शिवाजी महाराज विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील यांनी आपल्या मनोगतात उपक्रमामुळे शिक्षणाच्या प्रवासात अडथळे येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवीन उभारी मिळणार असून शिकण्याची इच्छा असेल, तर कोणतीही अडचण मोठी नसते असे म्हटले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व विविध शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले. पाच ते सहा होतकरू विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक खर्च देखील फाउंडेशन तर्फे उचलण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील, शाबान पिंजारी, परेश वाघ, गणेश भावसार, निलेश पाटील, चेतन चौधरी, सचिन पाटील, कल्पेश चौधरी, पुष्कर पाटील, दिवेश चौधरी, वेदान्त चौधरी यांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वैजंती पाटील,के.डी. चौधरी, एस. बी.काटे, एल. जी भामरे व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे व त्यांच्या डोळ्यांतील चमक बघून परिसरातील सर्व नागरिकांनी ब्राईड होप फाउंडेशनच्या सर्वांचे आभार मानले.श्री.जागृत हनुमान मंदिर मित्र मंडळ तांबेपुरा यांनी सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!