बारामती-भिगवण मार्गावर भीषण अपघात; उद्धटच्या २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, अज्ञात वाहन पसार

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-09-14 at 11.21.40 AM

बारामती-भिगवण मार्गावर भीषण अपघात; उद्धटच्या २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, अज्ञात वाहन पसार

(निलेश गायकवाड)

 

भिगवण :बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास बुलेट आणि अज्ञात चारचाकी वाहनादरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्देवी अपघातात बुलेटस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भोसले हा आपल्या ताब्यातील बुलेट (क्र. MH 42 BT 0007) वरून बारामतीहून भिगवणच्या दिशेने येत होता. कोठारी फार्म येथील धोकादायक वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की साहिल गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच ‘आपुलकीची जागा रुग्णवाहिका सेवा’ चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी साहिलला भिगवण येथील ‘लाईफ लाईन आय.सी.यू.’ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मृत साहिल याच्या आई-वडिलांचाही अवघ्या दोन वर्षांपूर्वी दुचाकी अपघातातच मृत्यू झाला होता. दोन वर्षाच्या काळात कुटुंबातील आधार असलेला तरुण मुलगाही अपघातात दगावल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने उद्धट, घोलपवाडी, पवारवाडी व भिगवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची खबर सौरभ प्रदीप भोसले यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!