माऊलींच्या गणरायाच्या दर्शनासाठी अमळनेरकरांची मांदियाळी; आग्रही आग्रह सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..
अमळनेर : विक्की जाधव.
श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आग्रही आग्रह सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाडी चौक येथे झालेल्या या भक्तिमय कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावत माऊलींच्या गणरायाचे प्रथम दर्शन घेतले. वेदपाठशाळा, वारकरी संप्रदाय, सुप्रसिद्ध शहनाई वादक देवश्री गुरव यांच्या सुरेल सादरीकरणासह आकर्षक आतषबाजीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार जितेंद्र ठाकूर, पत्रकार रवींद्र मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. माऊलींच्या जयघोषाने आणि गणरायाच्या भक्तिमय वातावरणाने वाडी चौक दुमदुमून गेला. मंडळाच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला. उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी भावना व्यक्त केली. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.