अमळनेर तालुक्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचा थरार; १७ सप्टेंबरपासून रंगणार मैदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260915-WA1179

अमळनेर तालुक्यात शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचा थरार; १७ सप्टेंबरपासून रंगणार मैदान

 

अमळनेर : विक्की जाधव.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ च्या शालेय शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, कबड्डी, खो-खो, क्रिकेट तसेच मैदानी स्पर्धांमधून अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून १७ व १८ सप्टेंबरला नोबल पोतदार स्कूल येथे बुद्धिबळ, १८ व १९ सप्टेंबरला प्रताप कॉलेज हॉल येथे बॅडमिंटन, २१ सप्टेंबरला तालुका क्रीडा संकुलात कुस्ती, २३ व २४ सप्टेंबरला प्रताप कॉलेज येथे फुटबॉल, तर २६ व २७ सप्टेंबरला जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर ३ व ५ ऑक्टोबरला अँड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल येथे कॅरम, ७ व ८ ऑक्टोबरला सायर देवी स्कूल येथे कबड्डी, १० व १२ ऑक्टोबरला आ.मा. पाटील आश्रमशाळा, रणाईचे येथे खो-खो, १३ व १४ ऑक्टोबरला प्रताप कॉलेज येथे क्रिकेट आणि १६ व १७ ऑक्टोबरला तालुका क्रीडा संकुलात मैदानी स्पर्धा होणार आहेत.
दरम्यान, तालुक्यातील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेजांनी स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन फी भरण्याची प्रक्रिया तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज पूर्ण करून संघ व खेळाडू तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी, एस.पी. वाघ व संजय पाटील यांनी ही माहिती दिली असून, आगामी स्पर्धांमुळे अमळनेरच्या शालेय क्रीडांगणावर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!