अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरची महसूल पथकाला गुंगारा देत पळापळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरची महसूल पथकाला गुंगारा देत पळापळ

 

अमळनेर : विक्की जाधव.

मंगळ मंदिराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या डोळ्यादेखत डंपरचालकाने डंपर भरधाव वेगाने पळवून नेल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. मंडळ अधिकारी नरेंद्रकुमार धनराळे यांच्या फिर्यादीनुसार, प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी धनराळे व ग्राममहसूल अधिकारी अदिती जरे यांच्यासह पथक कारवाईसाठी गेले होते. यावेळी एमएच १९ सीपी ७२७५ क्रमांकाचा डंपर मुरूम वाहतूक करताना दिसून आला. पथकाने थांबविण्याचा इशारा करूनही चालकाने दुर्लक्ष करत डंपर भरधाव वेगाने पळविला. महसूल पथकाने पाठलाग केला असता अमळनेर बसस्थानकाजवळ चालकाने डंपर दुसऱ्या बाजूने नेला आणि त्यानंतर इस्लामपुरा परिसरातील दुर्गा हॉस्पिटलजवळ पुन्हा अडविण्याचा प्रयत्न झाला; मात्र चालकाने तेथेही डंपर न थांबवता पुढे नेला.

महसूल अधिकाऱ्यांनी चालकाला थांबवून समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करत डंपर भरधाव वेगाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ अन्वये अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोहेकॉ मिलिंद सोनार करीत आहेत. विशेष म्हणजे अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासमोरच डंपर न थांबवता पळवून नेण्याच्या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कारवाईला वाहनचालकांनी किती गांभीर्याने घेतले आहे, असा सवाल उपस्थित होत असून या घटनेची शहरात चर्चा रंगली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!