उत्सव जल्लोषात, पण शिस्तीत! गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; खादी-खाकीची संयुक्त बैठक

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000df9881fd96673041af84cad1

उत्सव जल्लोषात, पण शिस्तीत! गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; खादी-खाकीची संयुक्त बैठक

अमळनेर : विक्की जाधव.

गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ‘खादी आणि खाकी’ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांनी शहरातील राजकीय पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची बैठक घेत गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिस व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील DJ च्या दणदणाटावर यंदा पोलिसांचा ‘कंट्रोल’ राहणार असून वेळेचेही कडक बंधन असणार आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंतच DJ-बँड वाजविण्यास परवानगी राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील आवाज आणि वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. उत्सवाचा जल्लोष नियमांच्या चौकटीतच ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार दिसून आला.

अनंत चतुर्दशीला अमळनेर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याबाबत डीवायएसपी विनायकराव कोते यांनी ‘मार्मिक’शी बोलताना सांगितले की, बाहेरून येणारे पोलीस बल, आरसीबी, क्यूआरटी, एसआरपीएफ, एलसीबी, ठाणे अंमलदार तसेच होमगार्ड अशा विविध पथकांची शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर राहणार असून कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

मद्यविक्रीच्या ठिकाणांवरही पोलिसांची खास नजर राहणार आहे.

शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्रीच्या ठिकाणांवर विशेष पथकांकडून निरीक्षण ठेवण्यात येणार असून अनधिकृत मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना आवाहन करताना, कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि परिस्थिती बिघडण्यापूर्वीच पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगितले.

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दाही बैठकीत महत्त्वाचा ठरला. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!