June 29, 2025 6:33 pm

मदनवाडी येथील उड्डाणपुलावर अवैधरित्या गोमांस घेऊन जाणारा पीकअप पलटी:नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी येथील उड्डाणपुलावर अवैधरित्या गोमांस घेऊन जाणारा पीकअप पलटी:नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या

(निलेश गायकवाड )

सोलापूर कडून -पुणे दिशेने अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या पीकअपला पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी उड्डाण पुलावर अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गावर पलटी होऊन त्यातील जनावरांचे मांस अक्षरशः महामार्गावर विखुरल्यामुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

या अपघातामुळे महामार्गावरील एकेरी वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

भिगवण पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये पुणे च्या दिशेने वाहतूक करणाऱ्या पिकअपमधून (एमएच 03 डीव्ही 1799) गोमांस वाहून नेले जात होते.सदर घटना सकाळी ठीक 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

पुढील अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!