प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मा. महापौरावर कठोर कारवाई करावी
दौंड वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
प्रतिनिधी / विकी ओहोळ
दौंड – वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर व आंबेडकरी घराण्यावर आक्षेपार्ह विधान (अपशब्द) वापरणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश गायकवाड याच्यावर कठोर कारवाई व्हावी व ईडीची चौकशी बसवावी असे निवेदन यावेळी दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना वंचित बहुजन आघाडी दौंड तालुक्याच्या वतीने देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी मनोगत व निषेध व्यक्त केला, ता सचिव अजिंक्य गायकवाड, शहर संघटक राहुल नायडू, शहर संघटक बबलू जगताप, शहर कार्याध्यक्ष शिवा खरारे, भीमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी भाऊ वाघमारे, उपाध्यक्ष रितेश सोनवणे, संघटक सुमित सोनवणे, सा.मा.प्रवीण भालेराव, सा.मा.आनंद रणधीर, करण खांडे, निलेश मिसाळ, सुमित शिंदे, गौरव शिंदे आदी मान्यवर यावेळी निवेदन देताना उपस्थित होते.