जालना महावितरण विज कंत्राटी कामगाराचे बेमुदत आमरण उपोषण
जालना (संतोष शिंदे)/- जिल्ह्यातील महावितरण कंपनीत 2 विभागात यंत्रचालक व लाईनमन असे सुमारे .350.कंत्राटी कामगार मागील 10 ते 12 वर्ष पासून नियमित रिक्त पदांच्या जागेवर कंत्राटी पद्धतीने काम करत असून यांचे माहे एप्रिल 2022 पासून वेतन मिळत नसल्या कारणाने संघटनेने अनेकदा अधिक्षक अभियंता जालना यांच्या कडे लेखी तक्रार देऊनही मागील 7 महिने कामगारांचे वेतन झाले नाही ही शोकांतिका आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या मुंबई औद्योगिक न्यायालयात चालू याचिकेतील कामगारांना पुढील आदेश येई पर्यंत कामावरुन कमी करू नये असे लेखी आदेश प्रशासनाला असताना व संघटनेने निदर्शनात आणून दिल्या नंतर सुद्धा अक्षम्य असे दुर्लक्ष केल्याने मा.न्यायालयाचा अवमान झाला त्यामुळे प्रकरणी याचिका दाखल करन्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे.
7 महिने वेतन न देता काम हकरून घेणे हे अमानवी व निसर्ग न्याया पासून कामगारांना वंचित ठेवल्यासारखे आहे. त्यामुळे सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, सर थकीत वेतन मिळावे, न्यायालय संरक्षित कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत बुधवार दिनांक 09 नोव्हेंबर 2022 पासून जालना महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय, कन्हैया नगर येथे बेमुदत आमरण उपोषण साठी संघटनेचे नूतन प्रदेश अध्यक्ष निलेश खरात व जिल्ह्यातील सुमारे 350 कामगार सहभागी होणार आहेत.अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा अशोक खंडागळे यांनी दिली आहे.