देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय मन की बात कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी कार्यकर्त्यांसोबत बघितला
शिरपूरात भाजपा तर्फे माजी केंद्रीयमंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांची जयंती साजरी
शिरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम दि. ३० आॅक्टोंबर रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम ऐकतानाचा अभिमानास्पद क्षण पुन्हा एकदा अनुभवता आला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय मन की बात कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी शिरपूर येथे कार्यकर्त्यांसोबत बसून सर्वांनी एकत्रितपणे कार्यक्रम पाहिला व ऐकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वक्तृत्वशैली सर्वांना आपलेसे करणारी आहे. अतिशय मुद्देसूद अशी मांडणी ते करतात. त्यांच्या मन की बात मधून कुठलाही विषय सुटत नाही. केंद्र सरकारच्या धोरणांसोबतच देशातील जनतेसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती यातून सामान्य जनतेला समजते. भविष्यातील योजना लक्षात येतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी थेट जोडले जातात. सरकारची भुमिकाही जनतेच्या लक्षात येते. सामान्य जनतेची मने जाणणारी मन की बात आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले. मन की बात कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे दूरदृष्टीचे नेते माजी केंद्रीयमंत्री स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमेस मार्ल्यापण व पुजन करुन भावपूर्ण आदरांजली वाहाण्यात आली. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, तालुका चिटणीस सुनिल चौधारी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, हिंगोणी अध्यक्ष जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष चौधरी, राजेंद्र चौधरी, जगदिश चौधरी, कुणाल माळी, शुभम सोनाल, भटु चौधरी आदि उपस्थित होते. भाजपाचे दूरदृष्टीचे नेते, माजी केंद्रीयमंत्री स्व. प्रमोद महाजन हे तळागाळातील समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण, प्रेरणादायी विचार, संघटन कौशल्य आणि मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व यांच्या बळावर त्यांनी अनेकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाची उणीव कायम भासत राहील ते एक ओजस्वी वक्ता, कुशल संघटक होते, ज्यांच्या वाणीचे विरोधकही चाहते होते, असे ओजस्वी वक्ते, माजी केंद्रीयमंत्री आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान स्व. प्रमोद महाजन यांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. त्यांचे राजकीय व सामाजिक विचार आम्हाला या सेवाकार्याच्या प्रवासात प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत राहतील असे हि प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी यावेळी सांगितले.
