June 30, 2025 3:21 am

पोलीस अधिक्षकांकडून कर्जत पोलिसांचा “बेस्ट डिटेक्शन” सन्मान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पोलीस अधिक्षकांकडून कर्जत पोलिसांचा “बेस्ट डिटेक्शन” सन्मान..

प्रतिनिधी.संदिप कायगुडे

कर्जत दि.३०- ७५ वर्षाची वृद्ध महिला घराबाहेर झोपली असताना रात्री घरात प्रवेश करत घराबाहेर येताना महिलेचा गळा दाबून, मारहाण करून कानातील व गळ्यातील दागिने बळजबरीने चोरून नेलेल्या गुन्हेगाराला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले.त्याने राशीन येथेही घरातून चोरी केल्याची कबुली दिली होती.या गंभीर गुन्ह्याचा तपास लावून अट्टल गुन्हेगाराला अटक केल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा सन्मान केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी,तालुक्यातील कोळवडी (खानवटेवस्ती) येथे दि.२५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करत बळजबरीने महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत ठकूबाई लाला खानवटे (वय ७५ वर्षे) यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीत असे म्हटले आहे की, फिर्यादी आपल्या कुटुंबासोबत राहत असून फिर्यादीचा मुलगा बबन खानवटे याने नवीन घर बांधल्याने व घराची अध्याप वास्तुशांती न झाल्याने फक्त फिर्यादी नव्या घरात झोपण्यासाठी जात होत्या.दि.२५ ऑगस्ट रोजी फिर्यादी घराच्या पोर्चमध्ये झोपल्या असताना मध्यरात्री बाथरूमसाठी उठल्या असता उशाला ठेवलेली बॅटरी मिळून आली नाही. त्यावेळी घरातून दोन इसम बाहेर आले आणि फिर्यादीचा गळा दाबून चापटीने मारहाण केली.’आरडाओरडा करू नको नाहीतर ठार मारीन’ अशी धमकी देत गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ,कानातील सोन्याची फुले असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला होता.
कर्जत पोलिसांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सतत पाठपुरावा ठेवून गोपनीय माहिती काढून पोखरणा अभिमान काळे, वय २४ वर्षे, राशीन, तालुका कर्जत यास ताब्यात घेतले व सखोल विचारपूस केली असता आता या घटनेतील मुद्देमाल त्याचे साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोखरणा अभिमान काळे (रा.राशीन) या अट्टल गुन्हेगाराने दिली असुन राशीन येथेही त्याने घरफोड्या,मोबाईलच्या चोऱ्या केल्या असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सदर आरोपीवर याअगोदरही जबरी चोरी घरफोडी चोरी तसेच मारहाण करणे असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस अमलदार मारुती काळे, श्याम जाधव, पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम भाऊ काळे अर्जुन पोकळे संपत शिंदे यांचाही बेस्ट डिटेक्शन सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला..

      

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!