June 29, 2025 2:20 pm

कर्मयोगीची आधारकाठी वृद्ध मंडळींच्या हाती..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगीची आधारकाठी वृद्ध मंडळींच्या हाती..
बुटीबोरी – कर्मयोगी फाऊंडेशनने २०२१ मध्ये १००१ आधार काठी वाटपाचा संकल्प केला होता. तो ३६ गावात १०२१ आधार काठी देऊन पूर्ण करण्यात आला. कर्मयोगी फाऊंडेशनने २०२२ मध्ये सुद्धा ५१ गावांमध्ये वृद्ध मंडळीना आधार काठी वाटपाचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ ला हनुमान मंदिर सोनूर्ली ता. जिल्हा नागपूर येथील वृद्ध मंडळीना आधार काठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमरूपी हास्य फुलविण्यात आले..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनूर्ली ग्रामच्या सरपंच कल्पना उलमाले उदघाटक सोनूर्ली गावचे प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी उलमाले, वासुदेव नागपुरे, प्रवीण डोईफोडे, आशा वर्कर गीता सरोदे ही मंडली व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती.
यावेळी उदघाटनिय भाषणात कृष्णाजी उलमाले म्हणाले की आज अशी परिस्थिती आहे की स्वतःचा पोटचा मुलगा सुद्धा आपल्या आई वडिलांचं करायला तयार नाही, अशा परिस्थितीत अनेकांच्या आई वडिलांचा आधार कर्मयोगी फाऊंडेशन होत आहे. आम्ही कर्मयोगी फाऊंडेशन बद्दल खूप ऐकलं होतं परंतु आज प्रत्यक्षात त्याच काम पाहून लक्षात आलं की खरा परमार्थ जर कोणी करत आहे तर तो आजच्या परिस्थितीत कर्मयोगी फाऊंडेशन करत आहे. भगवंत हे कर्मयोगी फाऊंडेशन खूप मोठं करोव अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो, असे ते आवर्जून म्हणाले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!