युवा कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी ताई डांगे यांनी शिवशक्ती तरुण मित्र मंडळ पिंपरी बुद्रुक आयोजित कीर्तन सोहळ्यानिमित्त प्रबोधन केले .
दिनांक : ३०/०९/२०२२
पिंपरी बुद्रुक : समाधान रजपूत.
समाजाने महिलांच्या शक्तीचा अभिमान बाळगला पाहिजे ,,,युवा कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी ताई डांगे यांनी शिवशक्ती तरुण मित्र मंडळ पिंपरी बुद्रुक आयोजित कीर्तन सोहळ्यानिमित्त प्रबोधन केले शारदीय नवरात्र उत्सव 2022 या निमित्ताने पिंपरी बुद्रुक येथे तुळजाभवानी मंदिरामध्ये हभप ज्ञानेश्वरी ताई डांगे यांनी किर्तन सेवेच्या माध्यमातून स्त्रियांना समाजामधून योग्य तो सन्मान व्हावा स्त्रियांनी प्रत्येक कार्यामध्ये आग्रही असावे अशा प्रकारचे कीर्तनाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले या कीर्तन सेवेसाठी गोंदी ओझरे पिंपरी बुद्रुक भजनी मंडळ उपस्थित होते नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन सेवा आराधी मंडळ यांचे गाणे अशा विविध कार्यक्रमाने शिवशक्ती तरुण मित्र मंडळ पिंपरी बुद्रुक नवरात्र उत्सव साजरा करत असतात. यासाठी समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असा साजरा केला.