June 29, 2025 9:16 pm

ठाणे महानगरपालिकेत 24 डॉक्टरांची सेवा ज्येष्ठता डावलून डॉ.राणी रामाराव शिंदे यांची वर्णी ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

ठाणे महानगरपालिकेत 24 डॉक्टरांची सेवा ज्येष्ठता डावलून डॉ.राणी रामाराव शिंदे यांची वर्णी ?

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात शिंदेशाहीने मनमानीपणाचा कळस गाठत सेवा ज्येष्ठता यादीत तब्बल 25 व्या स्थानावर असलेल्या डॉ.राणी रामाराव शिंदे यांना MHO पदावर पदोन्नती देताना त्यांच्या आधीच्या 24 सेवा ज्येष्ठ डॉक्टरांवर अन्याय केला आहे.ठाणे महापालिकेेत “शिंदे है तो लब कुछ मुमकिन है,” असे म्हटले जात होते,त्याचा प्रत्यय देणारी ही दुर्घटना आहे. ठाणे महानगरपालिका वैद्यकीय असोशिएशनने दबक्या आवाजात या मनमानी बद्धल आवाज उठवला आहे. त्यांचे पत्र सोबत जोडत आहे.

ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांच्यावर प्रचंड दबाव आणून ही पदोन्नती दिली जाणार आहे.
डॉ. राणी रामाराव शिंदे ह्या एका वजनदार नेत्याशी जवळ चे नाते संबंध असल्याने 24 ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा ज्येष्ठता डावलून 25 व्या क्रमांकावर असलेल्या डॉ.शिंदे यांना गैरमार्गाने पदोन्नती देण्याचा घाट रचला गेला आहे. सेवा ज्येष्ठता यादीत डॉ.बालाजी एस.गायकवाड हे भटक्या विमुक्त जमातीचे असून त्यांची नियुक्ती 18/12/1991ची असून त्यांचा जन्म दिनांक 1 ऑगस्ट 1965 चा आहे तर ते 31 जुलै 2023 रोजी सेवा निवृत्त होत आहेत.म्हणजे जेमतेम 10 महिने सेवा शिल्लक आहे.

या उलट डॉ. राणी रामाराव शिंदे यांचा जन्म 25 मे 1984 चा असून त्यांची 28 ऑगष्ट 2014 ला नियुक्ती झाली आहे.त्या 31 मे 2042 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत़ म्हणजे सुमारे 20 वर्ष सेवा शिल्लक आहे. त्यांचा सेवा ज्येष्ठता क्रमांक 25 असा आहे.असे असताना “शिंदे” या नाममहात्यामुळे 24 सेवा ज्येष्ठांना डावलून त्यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. धन्यती शिंदे शाही,आणि म्हणे आम्हीच खरे दिघे साहेबांचे अनुयायी ?

ही मनमानीच यांना घातक ठरणार आहे,हे मात्र निश्चित आहे.

दिलीप मालवणकर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!