June 29, 2025 3:35 pm

संत गाडगेबाबा यांचा दससूत्री संदेश बोर्ड लवकरात लवकर पुन्हा लावा, मंत्रालयातुन तो बोर्ड काढून धोबी समाजाच्या भावना दुखवु नका – एकनाथराव बोरसे

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्यमंत्री ना. शिंदे, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस व इतर मंत्र्यांकडे निवेदनव्दारे मागणी
संत गाडगेबाबा यांचा दससूत्री संदेश बोर्ड लवकरात लवकर पुन्हा लावा, मंत्रालयातुन तो बोर्ड काढून धोबी समाजाच्या भावना दुखवु नका – एकनाथराव बोरसे

शिरपूर : संत गाडगे बाबा यांचा दससूत्री असलेला संदेश बोर्ड लवकरात लवकर पुन्हा लावा, मंत्रालयातुन तो बोर्ड काढून धोबी समाजाच्या भावना दुखवु नका तो बोर्ड होता त्याच ठिकाणी परत लावावा असे अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालयात निवेदन देवुन केली आहे. तसेच राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री ना. अतुल सावे, बंदरे व खनिकर्म मंत्री ना. दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेवुन निवेदन दिलीत. तो बोर्ड दुरुस्ती करुन व आकर्षक छान प्रकारे बनवुन तातडीने लावण्यात येईल असे ना. मुनगंटीवार, सावे व भुसे यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, ठाणे जिल्हाध्यक्ष धनराज खैरनार हे उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन, आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावीत यांना हि निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. संत गाडगे बाबा यांचा दससुत्री संदेश असलेल्या तो बोर्ड पुन्हा लावण्यात येईल असे आश्वासन या मंत्र्यांनी दिले आहे. संत गाडगे बाबा यांचा फोटो व दससुत्री संदेश असलेला बोर्ड दुरुस्तीसाठी काही दिवसापुर्वी काढण्यात आला होता त्यामुळे राज्यातील संत गाडगे बाबा यांचे भक्त नाराज झाले होते.

यासाठी एकनाथराव बोरसे व अरुण धोबी यांनी मंत्रालय मुंबई येथे या मंत्र्यांना निवेदने दिलीत. निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मंत्रालयातील दर्शनी भागात राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे दससुत्री विचार असलेली पाटी व त्यांचा फोटो असलेली प्रतिमा होती. मात्र गेल्या काही दिवसापासुन पासुन ती प्रतिमा (पाटी) त्या ठिकाणावरुन काढुन टाकण्यात आली आहे. राज्यातील धोबी (परिट) समाजाचा वतीने विनंती की, ती पाटी परत होती त्याच ठिकाणी (पुर्ववत) लावण्यात यावी. त्या पाटीवर संत गाडगे बाबा यांची शिकवण व उपदेश भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वा, गरीब मुला-मुलींना शिक्षणाकासाठी मदत, बेघरांना निवारा, आश्रय, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी निराशांना हिंमत असे होते लिहिले आहे. हि पाटी काढल्यामुळे राज्यातील धोबी समाज व गाडगे बाबा भक्त संतप्त झाला आहे. तरी लवकरात लवकर ती पाटी होती त्याच ठिकाणी पुर्ववत लावुन राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचा बद्दल आदर व्यक्त करावा असे निवेदनात अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, ठाणे जिल्हाध्यक्ष धनराज खैरनार यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकास मंत्री ना. गिरिष महाजन, सहकारमंत्री ना. अतुल सावे, आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावीत, बंदरे व खनिकर्ममंत्री ना. दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!