June 29, 2025 8:52 pm

लातूरचा रिक्षा चालक बालाजी बनला लातुरचा बाहुबली

अपनी भाषा में पढ़े! Translate

आजकाल आपण पाहत आहोत की युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियामुळे माणूस रातोरात प्रसिद्ध होतो. अशा परिस्थितीत लातूर शहरात रिक्षा चालवणारा तरुण आपल्या गायनाने लातूर शहरात आणि परिसरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. कोणाकडूनही गाणे न शिकता ‘कौन है ओ कौन है… कहा से ओ आया…’ सारखी अवघड गाणी गाऊन हा तरुण लातूरकरांना मंत्रमुग्ध करत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लातूरच्या पाखरसांगवी (राजे शिवाजी नगर) येथील 34 वर्षीय बालाजी कांबळे हे लातूर शहरात राहतात. या तरुणाला लहानपणापासूनच गाण्याची व अभिनयाची आवड होती. बाहुबली चित्रपटातील गायक कैलाश खेर जी यांचे कौन है ओ…कौन हैं, हे गाणे उच्चारणे कठीण आहे. कैलाश खेर यांच्याप्रमाणेच बिहारमधील एका तरुणाने हे गाणे गाऊन वाहवा मिळवली. मग हे गाणे आपण का गाऊ नये, हा जिद्द बालाजी यांच्या मध्ये आली. त्यावरून त्याने हे गाणे गायले आणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. प्रतिसाद जबरदस्त मिळाला. बालाजी रिक्षा चालवताना गाणे म्हणतो प्रवासी देखील आवडीने बालाजी यांच्या रिक्षातून प्रवास करतात.तुम्हाला चांगले व्यासपीठ मिळावे, असे अनेकजण बालाजीला सांगतात. बाहुबली चित्रपटातील हे अवघड गाणे गाऊन बालाजीने लातूर परिसरात आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे हे गाणे बालाजीने कोणताही क्लास न घेता सराव करताना गायले. वरील गाण्यासोबतच देवा श्री गणेशा हे त्यांनी गायलेले गाणे आहे. सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळवत आहेत. घरची अवस्था बिकट असल्याने ऑटोरिक्षा चालवावी लागते. मात्र, योग्य संधी मिळाल्यास लातूरचे नाव गायन व अभिनय क्षेत्रात नक्कीच वाढेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!