गौरी सजवतीतून साकारला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
तक्रारवाडी गावातील श्री. विलास तुकाराम गडकर यांच्या घरातील गौरी सजावट दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी गौरी सजावटी मधून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास देखाव्यातून मांडण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतमाता , क्रांतिकारकांची चित्रे , माहिती , मूर्ती, स्वातंत्र्यलढ्यातील घोषणा, रांगोळी यांची सुबक मांडणी करण्यात आली आहे. तसेच या वर्षी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले “हर घर तिरंगा” हे आवाहन आपणाला देखाव्यातून साकारलेलेपहायला मिळते. ग्रामीण भागातील महिलांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहिती व्हावा व महिलांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून या सजावटीचे आयोजन करण्यात आले आहे असे सौ. रेश्मा गडकर यांनी सांगितले. सजावट करण्यासाठी सौ. सुषमा गडकर व सौ. स्नेहल गडकर यांचे सहकार्य लाभले.