June 30, 2025 7:23 am

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याचां वापर करावा-पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांचे आवाहन .

अपनी भाषा में पढ़े! Translate

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याचां वापर करावा-पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांचे आवाहन .
भोकरदन तालुका प्रतीनिधी डॉ संजीव पाटील.
भोकरदन:- तालुक्यातील सुरंगली येथे 3 सप्टेंबर म्हणजे शनिवारी भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी काशीविश्वेश्वर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीस भेट दिली.गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याचा वापर करावा,असे आवाहन यावेळी रत्नदीप जोगदंड यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्ग दर्शन करतानाकेले, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे न वाजवण्याचे आवाहनही जोगदंड यांनी यावेळी सर्व गणेश मंडळांना केले.यावेळी जोगदंड यांनी काशीविश्वेश्वरचेही दर्शन घेतले.काशी विश्वेश्वर गणेश मंडळांच्या वतीने पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश मंडळांचे अध्यक्ष भाऊ साहेब काळे,सचिव संजय शेंनफड दांडगे,उपसरपंच विनोद पाटील जाधव,काशी विश्वेश्वर मंदिर समितीचे सचिव माजी सरपंच पत्रकार डॉ संजीव पाटील,पत्रकार शेख समदभाई यांनी पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांचा सत्कार केला .

पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांचा सत्कार करताना गणेश मंडळांचे अध्यक्ष भाऊ साहेब काळे.

तसेच डी.एस.बी.विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बावस्कर यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी योगेश बुलगे,राहुल जाधव,सतीश सुरेश जाधव,भाऊसाहेब काळे,रामेश्वर दांडगे सर,उपसरपंच विनोद पाटील जाधव,संजय दांडगे,धनराज काळे,पत्रकार सुभाष वर्पे, पत्रकार शेख समदभाई,माजी सरपंच पत्रकार डॉ संजीव पाटील,सुभाष काळे आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.
सुरंगली हे गाव चांगले असुन येथे सर्व सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पडण्याची परंपरा आहे.हीच पंरपरा या पुढेही चालू ठेवावी.गणेश विसर्जनाच्या मिरवणूका शांततेत पार पाडाव्यात आणि विसर्जन मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्या चां वापर करावा ही चांगली प्रथा सुरंगली गावापासून सुरू करुन इतर गावांना आदर्श दाखवुन द्यावाअसे आवाहनही पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी यावेळी केले.

पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड मार्ग दर्शन करताना.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!