करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील व किल्ला विभागातील दिवंगत सामजिक कार्यकर्ते कै. नवनाथ दत्तात्रय कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी रंभापुरा येथील शाळा नंबर तीन येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तसेच पहिली ते चौथी मधील विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास दयानंद चौधरी सर, मुख्याध्यापक पारेकर सर, कोकाटे साहेब, खाडे सर, गोधडे सर, दीडवळ सर, ज्योतीराम ढाणे, संजय ढाणे, बळीराम दुधाट, संतोष करंडे, नवनाथ गोरे गोरे आदी उपस्थित होते.