June 29, 2025 3:43 pm

बोरगांव जि प शाळेत मोफत गणवेश वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आला.या वेळी प्रमुख अतिथी जि प सदस्य श्री भरत पाटील व पं स सदस्य श्री निंबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी शाळेसाठी संरक्षक भिंत व शाळेच्या पटांगणात फेव्हर ब्लॉक निधी साठी जि. प व पं. स सदस्यांनी मदत करावी अशी विनंती उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. जि प सदस्य श्री भरत पाटील, पं स समिती सदस्य श्री निंबा पाटील, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांचा सत्कार शाळा प्रशासना तर्फे करण्यात आला. श्री भरत पाटील व श्री निंबा पाटील यांनी प्रत्येकी 500 रु विद्यार्थ्यांना लेखन साहित्य घेण्यासाठी देणगी दिली तसेच पोलीस पाटील मनोहर पाटील व उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी शाळेसाठी उपयोगी वस्तू भेट दिल्यात.कार्यक्रमासाठी जि प सदस्य श्री भरत पाटील, पं स समिती सदस्य श्री निंबा पाटील, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, शालेय समिती अध्यक्ष राजू भिल, ग्रा पं सदस्य तानकु भिल, गावातील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल झुलाल कोळी, कौतिक येशी, गुलाब फुला भिल, संजीव पाटील, प्रकाश न्हावी, संगणक परिचालक जितेंद्र राजपूत, ग्रा प सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक श्री गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्रीमती अनिता जाधव यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!