स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विजय देवकाते यांचा माजी राज्यमंत्री भरणे यांच्याकडून सन्मान
इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे
रेडणी येथील विजय संजय देवकाते या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून त्याने भारतामधून 92 वा तर महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.या निमित्ताने विजय देवकातेंनी नुकतीच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली.
यावेळी भरणे यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल विजय देवकाते यांचा सत्कार केला.या प्रसंगी बोलताना श्री.भरणे म्हणावे की,या विद्यार्थ्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत यशाला गवसणी घातली आहे.एकीकडे गरिबी व दुसरीकडे वडिलांचे छत्र हरपले असताना तसेच प्रसंगी पार्टटाईम नोकरी करत करत तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाला आहे.त्याचे हे यश स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी असून त्याचे करावे तेवढे कौतुक थोडे असल्याचे सांगत श्री भरणे यांनी विजय देवकाते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
