सिद्धेश्वर निंबोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

सिद्धेश्वर निंबोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

(निलेश गायकवाड)

​सिद्धेश्वर निंबोडी ):
येथील ग्रामपंचायतच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी हा उत्सव मोठ्या गाजावाजात साजरा केला जातो; मात्र यावर्षी दिवंगत अजितदादा पवार यांच्या आकस्मित निधनामुळे ( दुर्घटनेमुळे ) भिम अनुयायांनी संवेदनशीलतेचा परिचय देत जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला.

​यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेमुळे कोणत्याही प्रकारचे वाद्य किंवा मिरवणूक न काढता केवळ वैचारिक अभिवादन करण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच – संतोष सोनवणे, माजी उपसरपंच – नामदेव बाड, सलीम मुलाणे, तुषार सवाणे, संतोष नगरे, संपत सवाने, राजू सवाने, गणेश खंडागळे, मंगेश खंडागळे तसेच उमेश सोनवणे, विक्रम जाचक, अंगणवाडी सेविका व गावातील महिला वर्ग यांसह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!