भिगवण व्यापार पेठेतील सुरक्षित व्यवसाय निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल;रोटरी क्लबच्या महत्वपूर्ण उपक्रमात व्यापारी सहभागी

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण व्यापार पेठेतील सुरक्षित व्यवसाय निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल;रोटरी क्लबच्या महत्वपूर्ण उपक्रमात व्यापारी सहभागी

(निलेश गायकवाड)

आज भिगवन रोटरी क्लबच्या वतीने “आत्मरक्षक” या विषयावर अग्नी स्थीतीच्या उपाययोजनांवर माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर भिगवण येथील दुर्गादेवी मंदिरात दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब भिगवनचे अध्यक्ष निखिल बोगावत व सर्व सदस्यांनी केले होते.

या शिबिरात भिगवण व भिगवण परिसरातील व्यापारी बंधूंनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आग विझवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी केले. यामुळे भिगवण व्यापार पेठेतील सुरक्षित व्यवसाय निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले.

पुणे रोटरी कल्बचे रो अशोक शिंदे पुण्याहून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाबद्दल रोटरी क्लबने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमात भिगवण जिल्हा परिषद गटाच्या सदस्य मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्य हेमा माडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला जाधव, भिगवण गावचे सरपंच आप्पाजी पवार तसेच मारुती वनवे,अशोक शिंदे,अशोक काटे प्रशांत शेलार, मा. उपसभापती संजय देहाडे आणि आसपासच्या क्षेत्रातील व्यापारी बंधू तसेच रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत भोंगळे यांनी केले, तर आभार संतोष सवाने यांनी मानले. या उपक्रमामुळे आगSafetyच्या दिशेने महत्त्वपूर्ण ज्ञान व संसाधने उपलब्ध झाली, ज्याचा लाभ भव्य समुदायाला होईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!