राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार युवा पिढीने नवनवीन कौशल्य आत्मसात करावे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये पार पडला यावेळी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. विविध भाषा, तंत्रज्ञान आणि संशोधन वृत्ती जोपासणे आवश्यक आहे.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे म्हणाले की,’ आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजा ओळखून कौशल्यधिष्ठित विद्यार्थी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देत आहे.एआय भीती नसून ती एक संधी आहे.
यावेळी शैक्षणिक, कला, क्रीडा व इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, तुकाराम जाधव, सुरेश मेहेर, पराग जाधव तसेच इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे, निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी केले.
पुरस्काराचे वाचन कला विभागाचे प्रमुख डॉ. भरत भुजबळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उबंरदंड, डॉ. राजाराम गावडे, डॉ. बाळासाहेब काळे, कनिष्ठ विभागाचे क्रीडाशिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले.
विद्यापीठ व महाविद्यालय गीत प्राध्यापिका स्वाती राऊत यांनी गायले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
तर आभार विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.