June 30, 2025 10:32 am

श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कुल मदनवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्सवात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कुल मदनवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्सवात साजरा

(निलेश गायकवाड )

भिगवण (मदनवाडी )- 15 ऑगस्ट येथील श्री म्हसकोबानाथ शिक्षण संस्था मदनवाडी येथील शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता झाली. संस्थेचे सचिव सौ.सीमा सतीश शिंगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धेने वेधले.वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या.

त्यानंतर यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे भिगवण गटाचे गटनेते संपत बंडगर, इंदापूर तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, सहाय्यक अभियंता अधिकारी शुभम बंडगर, चेअरमन विष्णुपंत देवकाते, जेष्ठ पत्रकार दादासो थोरात, संजय शिंदे, दिनेश शिंदे, संतोष अब्बाड,उमेश आढाव,वनवे, पत्रकार निलेश गायकवाड आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिली.

तसेच संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंगाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!