लोकप्रिय नगरसेवक संजय (पप्पू) सावंत यांचा वाढदिवस सामाजिक कृतज्ञतेने होणार साजरा; व्याख्यान आणि शैक्षणिक मदतीचा स्तुत्य उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक मा. श्री. संजय (पप्पू) सावंत यांचा २२ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. ‘कमी बोलणे आणि जास्त काम’ अशा आपल्या कार्यपद्धतीमुळे जनमानसात ‘दिलखुलास व्यक्तिमत्व’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय सावंत यांचा वाढदिवस यावर्षी अत्यंत विधायक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

संजय (पप्पू) सावंत यांनी आपल्या कामातून कै. सुभाष आण्णा सावंत यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. सलग तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी शहराच्या विकासात आणि जनसामान्यांच्या प्रश्ना सोडवण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्यावर जनतेने टाकलेला विश्वास नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही अधोरेखित झाला. त्यांच्या पत्नी सौ. मोहिनी संजय सावंत या नगरपालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत, तर त्यांच्या भावजय सौ. चैताली सावंत या देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणून आज सावंत कुटुंबाने करमाळ्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

वाढदिवसानिमित्त बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता, सावंत गल्ली गार्डन येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निर्मिती ग्रामीण विकास प्रतिष्ठान, नगर’चे संचालक प्रा. गणेश शिंदे हे ‘जिवन सुंदर आहे’ या विषयावर प्रबोधन करणार आहेत.

संजय सावंत यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने एक नम्र आवाहन केले आहे. वाढदिवसाला पुष्पहार किंवा गुच्छ आणण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वही, पुस्तके, पेन यांसारखे शालेय साहित्य भेट म्हणून द्यावे. या साहित्यातून गरीब मुलांच्या शिक्षणाला मोठी मदत होणार असून, वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक ऋण फेडण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमाला करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

करमाळ्याचे लाडके नेतृत्व, जनसेवेचा वसा जपणारे नगरसेवक मा. श्री. संजय (पप्पू) सावंत यांना वाढदिवसानिमित्त ‘मार्मिक समाचार’ परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड व निरामय आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!