June 29, 2025 3:13 pm

बोरगांव वि का सोसायटी चेअरमन पदी योगेंद्रसिंग सिसोदिया तर व्हा चेअरमन पदी दगेसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील बोरगांव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 2022-27 या कालावधी साठीची संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली होती तर आज झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत बोरगांव चे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांची चेअरमन पदी तर व्हा चेअरमन पदी माजी सैनिक दगेसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे – सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून दगेसिंग मोहनसिंग राजपूत, रघुनाथ झुलाल कोळी, हिरालाल चिंधा पाटील, पदमसिंग बहादूर राजपूत, लोटन शंकर धनगर, रजेसिंग भुता राजपूत, भटेसिंग पोलदसिंग राजपूत, खंडू झिंगा राजपूत तर राखीव मतदार संघातून गोकुळ चिंधा येशी, हरी उत्तम भिल, योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया व महिला मतदार संघातून विमलबाई सुजानसिंग राजपूत आणि मंगला जगतसिंग राजपूत.

सहाय्यक निबंधक अशोक बागल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील व सोसायटी सचिव नरेंद्रसिंग दुर्योधन गिरासे यांनी कामकाज पाहिले.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच नारायण लकडू राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, रजेसिंग मोहनसिंग राजपूत, बी डी सिसोदिया सर, सुभाष बारकू न्हावी, जयराम पोपट पाटील, कौतिक तोताराम न्हावी, दीपक राजपूत, धनसिंग राजपूत, नानेसिंग राजपूत, रोहिदास उत्तम कोळी, संजीव सजन पाटील, गुलाब फुला भिल, तानकु उखडू भिल व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, मा नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मा नगरसेवक अशोक कलाल, जि. प. सदस्या अभिलाषा भरत पाटील, पं. स. सदस्या विठाबाई निंबा पाटील, मा पं. स. उपसभापती जगतसिंग राजपूत, कल्याण ठाणे येथील बोरगांवकर बिल्डर चे मालक संजय धोंडू बोरगांवकर आदींनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!