श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त *हर घर तिरंगा रॅली* आयोजित करण्यात आली होती. रॅलीचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त सौ कल्याणीदेवी बिऱ्हाडेयांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप लोहार उपाध्यक्ष श्री अरविंद वैद्य विश्वस्त श्री राधेश्याम गुप्ता व्यवस्थापक श्री जोशी बाबा आदी मान्यवर उपस्थित होते..हर घर तिरंगा रॅली अंतर्गत बाजारपेठ परिसर बालाजी मंदिर व वरवाडे परिसरात रॅली काढण्यात येऊन विविध देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी होते. रॅलीत पारंपारिक आदिवासी नृत्य पंजाबी नृत्य व देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. संपूर्ण परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण होऊन सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले… कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले…