June 29, 2025 8:55 pm

आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतमध्ये पार पडली तिरंगा’ बाईक रॅली

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतमध्ये पार पडली तिरंगा’ बाईक रॅली

मोठ्या संख्येने नागरीक, शाळकरी मुलं -मुली,महिलांनी नोंदविला सहभाग

तालुक्यातील युवकांचा विशेष सहभाग
प्रतिनिधी संदिप कायगुडे
कर्जत.’स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा’उपक्रमाचे आयोजन केले आहे.कर्जत तालुक्यातील राशीन ते मिरजगाव जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन कर्जत भाजपा व आ.प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या जनजागृती रॅलीमध्ये हजारों च्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.या रॅलीला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला.

हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या मोहिमे अंतर्गत कर्जतमध्ये आ.राम शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये हजारो नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकवत या रॅलीत सहभाग नोंदवला.

आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासह कर्जत तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच शासकिय अधिकारी व मोठ्या संख्येने नागरीक, शाळकरी मुलं मुली, महिलांही या रॅलीत सहभागी झाल्या.

राशीन येथून या भव्य रॅलीला प्रारंभ करत कर्जत मार्गे ही रॅली मिरजगाव येथे नेण्यात आली . यावेळी राम शिंदे यांनी कर्जत येथे रॅलीला संबोधित केले. घरोघरी तिरंगा लावण्याच्या मोहिमेची जनजागृती होण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे असे ते यावेळी म्हणाले.
देशासाठी आयुष्याचा महत्वाचा वेळ दिलेल्या आजी माजी सैनिकांचा सन्मान करत आहोत.

यावेळी रॅलीतील नागरिकांनी मोठ् मोठयाने भारत माता की जय ,जय जवान जय किसान,वंदे मातरम या घोषना दिल्या.

तालुक्यातील सर्वात जास्त देशप्रेमी व युवक वर्गाचा यावेळी उत्साहाने या रॅलीत आसलेला सहभाग म्हणजे या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणावे लागेल.

या तिरंगा रॅलीत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनीही सहभाग नोंदवीला.यावेळी कर्जत पोलीसांचे विशेष सहकार्य लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!