वाढत्या महागाईच्या भस्मासुरा विरोधात दौंड मध्ये दौंड काँगेस कमिटीचे सरकार विरोधात तीव्र आंदोलन.
प्रतिनिधी/ विकी ओहोळ
दौंड तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आयोजित केलेल्या राज्यव्यापी आंदोलन आज दौंड काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई ,बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वर वाढवलेला जीएसटी, अग्निपथ योजना तसेच शेतकरी ( बळीराजा) वर अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान त्यांची नुकसान भरपाई मिळावे पशुखाद्याचे भाव कमी करावेत फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी अशा विविध मागण्या चे निवेदन मा. संजय पाटील तहसीलदार दौंड यांना देण्यात आले यावेळी दौंड विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल दोरगे ,शहर उपाध्यक्ष महेश जगदाळे ,तालुका महासचिव प्रकाश सोनवणे ,अॅड. अजयकुमार डेंगळे ,सोमनाथ सोडनवर ,नागेश फडके, पोपट गायकवाड, श्रावण वाघमारे ,अक्षय ओहोळ व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.