June 29, 2025 2:18 pm

राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत तालुक्यात शिंदे सरकार

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत तालुक्यात शिंदे सरकार

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींवर राम शिंदें गटाचे वर्चस्व

कर्जत जामखेडमध्ये भाजपला मिळाली नवसंजिवनी

प्रतिनिधी‌.संदिप कायगुडे
कर्जत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष पुरण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच कर्जत तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत तीन ग्रामपंचायतींवर राम शिंदें गटाने आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. हा आमदार रोहित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. त्यानंतर राम शिंदे यांचे अनेक विश्वासू साथीदार त्यांना सोडून रोहित पवारांच्या गटात गेले. यातच कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता गेली. या मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व पुन्हा प्रस्तापित व्हावे यासाठी राम शिंदे यांना विधानपरिषदेचे आमदार करावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यानुसार राम शिंदे यांना भाजप वरिष्ट नेत्यांनी विधानपरिषदेची संधी दिली.


कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचे जल्लोषात स्वागत
विधानपरिषदेचे आमदार होताच यांची कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली होती. शिंदेंच्या आमदारकीमुळे कर्जत व जामखेड तालुक्यांतील भाजप कार्यकर्त्यांत नवसंजीवनी मिळाल्याची स्थिती आहे. अशातच तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळाले.

कोरेगाव ग्रामपंचायतीत 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 तर कुळधरणमध्ये 13 पैकी 7 उमेदवार भाजपचे निवडून आले. या विजयामुळे राम शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!