फेम इंडिया योजनेखाली आणखी दोन हजार ८७७ इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्थानकांना मंजुरी
विद्युत वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादन अर्थात फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारनं २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ६८ शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी दोन हजार ८७७ चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात काल ही माहिती दिली. इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जावा यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं २११५ मध्ये फेम इंडिया योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत नऊ द्रुतगती मार्ग आणि १६ महामार्गांवर एक हजार ५७६ चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात आली आहेत. फेम इंडिया योजनेच्या पहिल्या टप्प्यात, यावर्षी १ जुलैपर्यंत ४७९ चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहेत. अशीही माहिती गुर्जर यांनी या उत्तरात दिली आहे.फेम-इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ एप्रिल २११९ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असंही उत्तरात नमूद केलं आहे.