June 29, 2025 8:37 pm

प्रांताधिकारी शिंदे यांच्या वाहनाला अपघात, दोन जण गंभीर जखमी

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोलापूर : शासकीय कामकाजासाठी पुण्याला निघालेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवन जवळ अपघात झाला या अपघातात दोन अव्वल कारकून हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.अव्वल कारकून उमेश वैद्य व राजकुमार वाघमारे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोन्ही जखमी हे मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते. दरम्यान ते भिगवण जवळ गेले. असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, कंटेनरची धडक झाली त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.दरम्यान सोलापूर जिल्हाचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला. त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे हे नव्हते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!