पिंपळे गावात विविध सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन;रोटरी क्लब भिगवण व पिंपळे ग्रामपंचायत चा सक्रिय सहभाग
(निलेश गायकवाड )
रोटरी क्लब भिगवन व पिंपळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे येथे विविध सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आले .वृक्षारोपण, त्यासाठी ट्रिगार्ड, हॅप्पी फॅमिली किट , प्लास्टिक बॉटल क्रॅश मशीन, प्लास्टिक संकलन बॉक्स, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप,महिला बचत गटातील महिलांसाठी स्टेशनरी तसेच श्रमदान करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून शरयू फाउंडेशन च्या अध्यक्ष शर्मिलाताई पवार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने सहभागी रोटरी क्लब ऑफ भिगवन, पिंपळे ग्रामपंचायत, सौ माया झोळ,श्रीनिवास वायकर,श्रमदान ग्रुप, गनराज कन्स्ट्रक्शन अहमदनगर, सायकल क्लब भिगवन, डॉक्टर असोसिएशन, कै.सदाशिव बयाजी चोरमले स्मरणार्थ,यांच्या माध्यमातून पिंपळे येथे उपक्रम राबविण्यात आले.
सौ.शर्मिला पवार- भिगवन रोटरी क्लब ने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे पिंपळे गावातील नागरिकांना या विविध उपक्रमांचा फायदा होईल.

अध्यक्ष संजय खाडे – इंदापूर तालुक्यात प्रथमच रोटरी क्लब भिगवन च्या वतीने पिंपळे येथे पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आल्याने त्यांचे समाधान आहे.तसेच प्लास्टिक बोटल क्रॅश मशीन व प्लास्टिक संकलन बॉक्स हा इंदापूर तालुक्यातील प्रथमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिलाताई पवार, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश खटकाळे, दादा बागल, रोटरी क्लब अध्यक्ष संजय खाडे, ग्रामपंचायत सदस्य अर्पिता चोरमले,सविता काटे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, सचिव सुषमा वाघ, नियोजित अध्यक्ष अमोल खानावरे,संपत बंडगर, रियाज शेख, संजय चौधरी, नामदेव कुदळे, संतोष सवाने, औदुंबर हुलगे, वैशाली बोगावत, तहमिन शेख, मीनाताई बंडगर, रेखा खाडे, दिपाली भोंगळे, ललिता वाकसे, शुभांगी रायसोनी, आशा चौधरी, डॉ स्मिता खानावरे, सपना दोशी, प्राची थोरात, पदमा खरड, तसेच ग्रामसेविका रंजना हांगे यांनी सर्व नियोजन करण्यात आले तसेच महिलांची सक्रिय सहभाग व ग्रामस्थ उपस्थित होते.
